Swati Maliwal : केजरीवालांच्या घरी महिला खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण

303
AAP : स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका? पतीचा आरोप

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या पीएवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी ही घडली. मालीवाल यांनी येथूनच सकाळी ९ वाजता पीसीआर कॉल केला होता. फोन केल्यानंतर दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी पोहोचले. (Swati Maliwal)

(हेही वाचा- Rahul Dravid : राहुल द्रविड प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणार की नाही?)

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी सोमवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांचे पीए विभव कुमार (Vibhav Kumar) यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर मालिवाल यांनी पीसीआर कॉल केला होता. फोन केल्यानंतर दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानी पोहोचले. मात्र, त्या घटनास्थळी नव्हत्या. (Swati Maliwal)

अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही
याप्रकरणी स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिलेली नाही. आपण आधी मीडियाशी बोलणार आहोत आणि नंतर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करणार आहे, असे मालिवाल म्हणाल्या आहेत. आपल्याला पत्रकारांचे फोन येत असल्याची माहिती सुध्दा मालिवाल यांनी पोलिस निरिक्षकांना दिली. (Swati Maliwal)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीसाचा भाजपामध्ये प्रवेश)

पोलीसातील सूत्रांनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता स्वाती मालिवाल (Swati Maliwal) तेथे सापडल्या नाहीत. यानंतर पोलिसांनी त्याला बोलावले आणि नंतर तक्रार करणार असल्याचे त्याने सांगितले. प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलीस सीएम हाउसच्या आत जाऊ शकत नाहीत. पीसीआर कॉलचे सत्य काय आहे? याचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. विशेष आयुक्त कायदा व सुव्यवस्था रवींद्र सिंह यादव (Ravindra Singh Yadav) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Swati Maliwal)

अनेक नेते प्रकरण मिटवण्यात गुंतले
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Swati Maliwal) यांनी भडकाविल्यामुळे विभव कुमार (Vibhav Kumar) यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप मालिवाल यांनी केला आहे. अशा परिस्थितीत स्वाती यांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस केजरीवाल यांनाही या प्रकरणात आरोपी करू शकते. (Swati Maliwal)

(हेही वाचा- CBSE Result 2024: CBSE दहावी, बारावीचा निकाल लागला ; ८७.९८ टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल)

प्रोटोकॉलनुसार, पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश करू शकत नाही. अशात, पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले जावू शकतात अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री निवासस्थानातील सर्व नेते या प्रकरणावर तोडगा काढण्यात व्यस्त आहेत. तर स्वाती यांना शांत करून तक्रार न करण्यासाठी राजी केले जात असल्याची सुध्दा चर्चा आहे. (Swati Maliwal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.