एक दशकापूर्वी सीरियावर आयएसआयएसआय या दहशतवादी संघटनेने आक्रमण करून या देशाचा ताबा घेतला होता. त्यानंतर हा देश जागतिक पातळीवर दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा अड्डा बनला होता. मात्र रशियाच्या आक्रमक धोरणामुळे येथील दहशतवाद निवळला आणि तिथे सरकार स्थापन झाले. मात्र आता सीरिया पुन्हा पेटले आहे. येथील सत्तांतर करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी देशावर आक्रमण करून जवळजवळ सर्व देशाचा ताबा मिळवला आहे. इतकेच नव्हे तर देश सोडून पळून जाताना देशाचे राष्ट्रप्रमुख बशर अल असद यांचे विमान पडल्याचे वृत्त समोर आले आहे.
बशर अल असद यांचे विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे. त्यांचे विमान हवेत असताना अचानक रडारवरुन गायब झाले आणि काही वेळानंतर विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा केला जात आहे. या विमानातून बशर अल असद आपल्या कुटुंबासह देश सोडून जात होते. दरम्यान, बंडखोरांनी हे विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. दुसरीकडे, बंडखोरांनी सीरियातील (Syria) अलेप्पो, होम्स आणि दारासह प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे. होम्समध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या वडिलांचा पुतळाही बंडखोरांनी उद्ध्वस्त केला. सीरियन सैन्य लोकांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरले आहे.
(हेही वाचा शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं प्रतिउत्तर, ‘किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका’)
सीरियाचे (Syria) पंतप्रधान मोहम्मद गाजी जलाली यांनी आपण शांततेने विरोधी पक्षाकडे कारभार सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या निवासस्थानी आहे, कुठेही गेलो नाही. मला माझ्या देशावर प्रेम आहे. त्यांनी सीरियन नागरिकांनाही शांततेचे आवाहन केले आहे. बशर सरकार कोसळल्यानंतर सीरियातील (Syria) बंडखोर गट ‘जिहादी हयात तहरीर अल-शाम’ (एचटीएस) सत्तेवर येणार आहे. या गटाचा प्रमुख अबू मोहम्मद अल-गोलानी याच्या हाती देशाची सत्ता जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community