T20 World Cup 2022 : आता ‘३० ऑक्टोबर’च्या सामन्याची प्रतीक्षा

121

T20 World Cup 2022 च्या क्रिकेट सामान्यांच्या मालिकेत बी ग्रुपमध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका अव्वल स्थानी गेले आहेत. भारताने सलग दोन सामने जिंकल्याने या ग्रुपमध्ये भारताच्या खात्यात ४ पॉईंट आले आहेत, त्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर गेला आहे, तर साऊथ आफ्रिकाने आयर्लंडला हरवल्याने साऊथ आफ्रिका ३ पॉइंटने दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. मात्र आता ३० ऑक्टोबर रोजी याच दोन तुल्यबळ संघात सामना रंगणार आहे. ज्यामध्ये भारत अव्वल स्थान कायम ठेवणार कि साऊथ आफ्रिका भारताचा पराभव करून पहिल्या क्रमांकावर पोहचणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारत विरुद्ध नेदरलँड (IND vs NED) सामना नुकताच सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. सामन्यात भारताने उत्तम फलंदाजी आणि नंतर दमदार गोलंदाजी करत 56 धावांनी विजय मिळवला. भारताने आधी फलंदाजी करत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर नेदरलँड संघाला 123 धावांत रोखले, ज्यामुळे 56 धावांनी सामना भारताने जिंकला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले. गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँडची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही. या विजयासह भारत ग्रुप बी मध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.

(हेही वाचा Infantry day : स्वतंत्र भारताची पहिली लष्करी कारवाई)

बी ग्रुपमध्ये कुणाला किती पॉईंट्स?  

  • भारत २ सामने खेळाला दोन्ही जिंकला आणि ४ पॉईंट्स जमले आहे.
  • साऊथ आफ्रिका २ सामने खेळाला १ सामना जिंकला आणि ३ पॉईंट्स मिळवले आहेत.
  • बांगलादेशने २ सामने खेळले त्यातील १ सामना जिंकला आणि २ पॉईंट्स मिळवले.
  • झिम्बॉवे १ सामना खेळली तो अनिर्णायक ठरला मात्र यात झिम्बॉवेच्या खात्यात १ पॉईंट जमला.
  • पाकिस्तान १ सामना खेळाला, तोही हरला त्यामुळे पाकिस्तानचे शून्य पॉईंट्स आहेत.
  • नेदरलँड २ सामने खेळला पण दोन्ही सामने हरला त्यामुळे नेदर्लंडकडेही शून्य पॉईंट्स आहेत.

(हेही वाचा तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.