बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आमदार विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना एक महिन्यात खाली करायला लावला बंगला)
मॅनहोल मध्ये जाऊन लोक दगावत आहेत तरीही त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपण ज्यावेळी बैठक घेणार आहात त्यावेळी यापूर्वी याबाबत झालेल्या बैठकीतील मुद्दे विचारात घ्यावेत असे डॉ. गोऱ्हे यांनी मंत्री उदय सामंत यांना सांगितले. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, सफाई कामगार हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. याविषयाबाबत तातडीने पूर्व तयारीचीबैठक घेतली जाईल आणि यापूर्वी झालेल्या बैठकीचे मुद्दे देखील विचारात घेतले जातील असे सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community