शिवसेनेची ‘त्या’ ३९ आमदारांविरुद्ध याचिका दाखल

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन घेण्यात आले, त्यावेळी शिवसेनेच्या महाविकास आघाडीला विरोध करणाऱ्या ३९ आमदारांनी यावेळी त्यांनी शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप न मानता शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकरांना मत दिले. त्यामुळे शिवसेनेने या ३९ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे.

दोन्ही बाजूने अध्यक्षांना पत्र 

या याचिकेच्या माध्यमातून शिवसेनेने व्हीप न पाळणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे ही निलंबन याचिका दाखल केली आहे. ९ दिवस आणि ९ रात्रीच्या सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. शिवेसेनेच्या सर्वच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केले. व्हीप बजावल्यानंतर बंडखोरांपैकी काही मते आपल्या बाजूने वळतील, अशी शिवसेनेला आशा होती. मात्र एकाही बंडखोर आमदाराने राजन साळवी यांना मत दिले नाही. साहजिक राजन साळवी यांचा पराभव झाला. अध्यक्षांच्या निवडणुकीत मतमोजणी झाल्यावर तात्काळ शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देऊन शिंदे गटाने जो व्हीप काढला तो १६ आमदारांनी पाळला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे आता अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

(हेही वाचा मेट्रो पर्यावरणपूरकच, आरे कारशेड विरोधातील आंदोलन स्पॉन्सर्ड – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here