गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) या मुद्द्यावर सक्रिय आहेत आणि मुंबईतील विविध भागातील मशिदींवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकरविरुद्ध मोहीम राबवत आहेत. सोमय्या यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या आहेत आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच किरीट सोमय्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध सतत आवाज उठवत आहेत. (Kirit Somaiya)
72 मशीद/भोंगे शिवाजी नगर गोवंडी मुंबई
रोज भोंगे जोरात वाजत आहे…
लाऊडस्पिकरच/भोंग्याची परवानगी एकही मशिदनी घेतलेली नाही
काल शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार केलीउद्या पासून कारवाई होणार
अनधिकृत मस्जिदी/भोंगे यादी
1 अलभदिना मस्जिद व मदरसा आता-ए- रसुल तालीमुल कुराण
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 6, 2025
मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरविरोधात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (५ एप्रिल) शिवाजी नगर-गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा-World Health Day : निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि झोप यांचा समतोल साधा !
सोमय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आरटीआयची एक प्रत शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशन परिसरात आणि त्याच्या आसपासच्या वसाहतींमध्ये बेकायदेशीर लाऊडस्पीकरचा वापर होत असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांनी शेअर केलेल्या आरटीआय प्रतीमध्ये असे म्हटले आहे की, या अर्जात देवनार, शिवाजीनगर, टिळकनगर पोलिस स्टेशन परिसरात लाऊडस्पीकर वापरणाऱ्या मशिदींची संख्या मागितली होती. (Kirit Somaiya)
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, हे लाऊडस्पीकर कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय बसवण्यात आले आहेत, जे नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस पुढील ७२ तासांत कारवाई सुरू करतील, अशी माहिती ट्वीटकरत सोमय्या यांनी दिली. तसेच त्यांनी तक्रार दाखल केलेल्या मशिदींची नावे देखील शेअर केली आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community