Naresh Mhaske : शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ सालापासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Naresh Mhaske)
तक्रारीला नऊ वर्षे आणि गुन्हा दाखल होऊन तीन वर्षांनंतरही राऊतांवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याने स्वप्ना पाटकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर शनिवार, २२ मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली. ते पुढे म्हणाले की, “राऊत विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात () दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. राऊत यांना कोण पाठिशी घालत आहे? राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का,” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
(हेही वाचा – World Meteorological Day: ‘असा’ साजरा करतात ‘जागतिक हवामान दिन’; जाणून घ्या इतिहास)
“राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही? दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का? स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करीत आहेत. त्यावरं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची भूमिका काय,” असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. “स्वप्ना पाटकरला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे,” असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community