नोएडासारखेच मुंबईतील अनधिकृत टाॅवर्सवर कारवाई करा; सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

140

नोएडामधील अनधिकृत टाॅवर्सवर कारवाई करण्यात आल्यानंतर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील अनधिकृत टाॅवर्सचा मुद्दा उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनी बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे विशेष ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले मुंबईत भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेले शेकडो टाॅवर्स आहेत. या ठिकाणी पाच ते 10 वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. बिल्डरने या ठिकाणी अनधिकृतपणे अतिरिक्त मजले बांधले आहेत. 25 हजारांहून अधिक  फ्लॅटधारक ओसी न मिळाल्याने चिंतेत आहेत. त्या बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट्राचारी अधिकारी यांचे विशेष ऑडिट करावे अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

( हेही वाचा: गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गीका तयार करा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

वरळीमध्ये अर्धा डझन बेनामी गाळे 

मध्यमवर्गीय गाळेधारक आणि फ्लॅटधारक यांचे संरक्षण झालेच पाहिजे, यासाठी माझे एकनाथ शिंदे, फडणवीसांना आवाहन आहे. ठराविक बिल्डरला, फ्लॅटधारकांना माफी, असा भेदभाव करु नये, असेही त्यांनी सांगितले. तसेच, किशोरी पेडणेकर यांनी बेनामी गाळ्यांचा ताबा घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा मी एसआरए प्राधिकरणात जाऊन कारवाईची मागणी केली आहे. या आठवड्यात पुन्हा पाठपुरावा करणार. वरळीमध्ये अर्धा डझन बेनामी गाळे त्यांनी ताब्यात घेतले, असा आरोप त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.