कोविड काळात घराच्या बाहेरही न पडणारे उध्दव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्य़ासाठी सरसावले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आपले घोडे दामटवण्याचे काम ठाकरे यांच्याकडून सुरु आहे. पण, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच गठीत केलेल्या समितीचे प्रमुख न्या. चांदीवाल यांनी केलेल्या खुलाशामुळे ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून, राज्याच्या जनतेसमोर त्यांचे पितळ उघडे पडल्याचा हल्लाबोल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते व उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर प्रमुख गोविंद बोरसे, भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक महानगर सरचिटणीस नाना शिलेदार, अनुसूचित जातीं मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, महानगर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, शहरचिटणीस हेमंत शुक्ल, भाजपा तपोवन मंडल प्रसिद्धीप्रमुख अनिल शिंदे आदि उपस्थित होते.
(हेही वाचा – पंतप्रधान संग्रहालयातून नेलेली नेहरूंची कागदपत्रे Sonia Gandhi आता जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडला देणार?)
यावेळी पुढे बोलताना माधव भंडारी (Madhav Bhandari) म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणी वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारनेच नियुक्त केलेल्या न्या. चांदीवाल यांनी समाजमाध्यमात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी करत आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे ठाकरे यांनी जाणूनबुजूण समोर येऊ दिले नाही. असे न्या. चांदीवाल यांनी स्पष्ट केल्याने भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी ठाकरे व महाविकास आघाडी तत्पर असल्याचे आता उघड झाले आहे. तसेच चांदीवाल आयोगाने क्लीन चिट दिल्याचा अनिल देशमुख यांनी केलेला दावाही फसवा असल्याचे न्या. चांदीवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची संपूर्ण कारकिर्द भष्टाचाराने बरबटलेली होती. या आरोपांना आता बळच मिळत असल्याचे भंडारी यावेळी म्हणाले. तसेच विरोधकांच्या आघाडीचे नाव महाविकास आघाडी असले तरी विकास फक्त त्यांच्या नावातच आहे. राज्याच्या विकासाला स्थगिती देऊन वसुलीचा सपाटा लावलेल्या महाविकास आघाडीने महाराष्ट्राला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. विकासाच्या मुद्दयावर बोलण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही, असा दावाही त्यांनी केला.
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम
महायुती सरकारने सुरु केलेल्या योजनांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केले जात आहेत. पण नाशिकमध्ये येणारा महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता हेच सांगत आहे की, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरही कोणतीच योजना बंद होणार नाही. पण, चुकूनही महाविकास आघाडी सत्तेत आली तर ते या सर्व योजना बंद करण्याचे पाप करतील. तसेच तत्कालीन महाविकास आघाडीने चांदीवाल अहवाल जनतेसमोर मांडला पाहिजे. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही तो अहवाल नक्कीच जाहीर करणार आहोत. त्याचबरोबर पुर्ण बहुमताचे सरकार राज्यात अस्तित्वात येईल हा आम्हाला विश्वास आहे. जनतेचा विश्वासघात होणार नाही. राज्याला विकासाकडे कसे घेऊन जाता येईल, यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community