बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत तात्काळ पावले उचला; पालकमंत्री लोढा यांचे निर्देश

179

मालाड – मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस विभागाने तात्काळ पावले उचलावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी दिले.

( हेही वाचा : अंधेरी पश्चिम भागातील दोन वर्षांत ९७७ गळत्या दूर, पुढील गळत्या दुरुस्तीवर करणार सुमारे १४ कोटींचा खर्च)

बांगलादेशी आणि रोहिंग्यांची माहिती मिळवण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी समिती गठित करण्यात आली होती. गुरुवारी पालकमंत्री लोढा यांनी या समितीची आढावा बैठक घेतली. मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवर केलेला अवैध बळकावा, त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, तसेच त्यातून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली अवस्था, यासर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अवैध घुसखोरांविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

यावेळी उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे उपायुक्त शंकर वार, किरण दिघावकर, डीसीपी झोन ११ चे विशाल ठाकूर,शिधा वाटप अधिकारी राहुल साळुंखे यावेळी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.