प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा; Hindu Janjagruti Samiti ची मागणी

168

मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला, हिंदूंचा जो वंशविच्छेद झाला; हिंदू महिलांवर जे अत्याचार झाले; लहान बालकांच्या हत्या झाल्या, त्याविषयी कधी इल्तिजा मुफ्ती यांना लाज वाटली का ? गेली अनेक वर्षे काश्मीरातील लाल चौकात दिवसाढवळ्या भारताचा राष्ट्रध्वज जाळला जात होता, त्या वेळी कधी मुफ्ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ? ते आज श्रीरामाला लाज वाटली पाहिजे म्हणत आहेत. भगवान श्रीरामाचा अवमान करणार्‍या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janjagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे.

नुकतेच काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी ‘एक्स’वर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्याने कोट्यवधी भारतियांना ग्रासले आहे आणि देवाचे नाव कलंकित केले आहे. प्रभु राम यांना लाज वाटली पाहिजे’, असे लिहले आहे. एक कथित व्हीडीओ जो कोणत्या ठिकाणचा आहे, केव्हाचा आहे, याची काही माहिती न देता त्यावरून थेट हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीराम यांच्याविषयी आणि हिंदु धर्माविषयी वक्तव्य करून इल्तिजा यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. (Hindu Janjagruti Samiti)

(हेही वाचा कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध)

अशा प्रकारचे वक्तव्य जर एखाद्या हिंदूने केले असते, तर लगेच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या गेल्या असत्या. त्यांच्यावर लगेच कारवाई झाली असती. मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात बी.के. गंजू यांना एका कन्टेनरमध्ये डांबून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्यासमोर त्यांच्या लहान मुलाला ठार मारून त्याचा रक्तमिश्रीत भात खायला लावला, याविषयी कधी मुफ्ती परिवाराला लाज वाटली नाही, असेही समितीने (Hindu Janjagruti Samiti) म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.