Chandrasekhar Bawankule : हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या – चंद्रशेखर बावनकुळे

‘या देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू’, याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय रहाणार नाही, अशी चेतावणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

130
Chandrasekhar Bawankule : हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या - चंद्रशेखर बावनकुळे
Chandrasekhar Bawankule : हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिला आरक्षण’ कायदा केला. (Chandrasekhar Bawankule) त्यामुळे लोकसभेच्या संसदेत १९१ महिला खासदार होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा सभागृहात १०० महिला आमदार होणार आहेत. त्यामुळे देशातील १४० कोटी लोकांना मोदीच पुन्हा प्रधानमंत्री हवे आहेत. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांचे राममंदिर साकारात आहे. मोदींना हारवण्यासाठी मुंबईत २८ पार्टी एकत्र आल्या. त्यातील एका पार्टीचा मुख्यमंत्री स्टॅलिनचा मुलगा उदयनिधी म्हणतो, ‘’या देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू.’’ याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय रहाणार नाही, अशी चेतावणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.  (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – Ind vs Pak World Cup 2023 : ‘भारताविरोधात 5 विकेट घेणार’; सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची हुंकार)

भाजपातर्फे शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘घर चलो अभियान’ आणि भाजपा वॉरिअर्स संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, निवडणूक प्रमुख महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, संयोजक विजय फुगे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी, मा. नगरसेवक, मंडलप्रमुख उपस्थित होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासह ‘भारत माता की जय’ अशा जयघोषांनी दिघी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात भाजपाने शक्तीप्रदर्शन केले. (Chandrasekhar Bawankule)

दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ या अभिमानातून दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पुढाकार घेत आहेत. त्यासाठी हातात माती घेतलेला फोटो काढावा. महाराष्ट्रातून किमान १ कोटी फोटो संकलन करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले. तसेच, माजी सैनिक संघटना आणि नाभिक समाज संघटनेने भाजपाला पाठिंबा दिला. (Chandrasekhar Bawankule)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.