आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे लोकांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात कुर्ला (पश्चिम) एल वॉर्ड येथे सोमवारी ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच १३० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
(हेही वाचा – Mangal Prabhat lodha : पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या कार्यक्रमात बत्ती गुल; अधिकाऱ्यांना फुटला घाम)
यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community