चंद्रकांत खैरेंच्या मुलाने बदलीसाठी घेतले पैसे: ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

148

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषीकेश खैरेंवर करण्यात आला आहे. यासंबंधित सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात याची खळबळ माजली आहे. या ऑडिओमध्ये बदली न झाल्यामुळं पैसे परत करण्याचा तगादा संबंधित व्यक्ती करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ऋषीकेश खैरे अडचणीत आले आहेत. तसंच मविआ सरकारच्या काळात शासकीय बदल्या पैसे घेऊन केल्या जात होत्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

ऑडिओ क्लिपमधील माहितीनुसार, मविआ सरकारच्या काळात ऋषीकेश खैरे यांनी एका अधिकाऱ्याकडून वन विभागात बदली करून देण्यासाठी २ लाख रुपये घेतले होते. पण दोन वर्ष होऊनही बदली काही झाली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे पैसे परत करण्याची मागणी या ऑडिओ क्लिपमध्ये केली गेली आहे.

ऑडिओ क्लिपमधील संवाद

ऋषीकेश खैरे: हॅलो
आरोप करणारा तरुण, विजय: बोला भाऊ
ऋषीकेश खैरे: कुठे आहे तू…
आरोप करणारा तरुण, विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषीकेश खैरे: : आ…
आरोप करणारा तरुण, विजय: शेंद्राला
ऋषीकेश खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झालं?
आरोप करणारा तरुण, विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये, काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही, तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषीकेश खैरे: आज काय तारीख आहे? २३ तारीख आहे. पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
आरोप करणारा तरुण, विजय: आता लय वेळीस सांगितलं न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथं आलो होतो.
ऋषीकेश खैरे: १०० टक्के होईल
आरोप करणारा तरुण, विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोनं चांदी देखील मोडलं आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही? माझं काम देखील नाही झालं बदलीचं, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे.
ऋषीकेश खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो.
आरोप करणारा तरुण, विजय: न काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडं बदलीसाठी
ऋषीकेश खैरे: अच्छा दिलेले आहे का?
आरोप करणारा तरुण, विजय: हो
ऋषीकेश खैरे: पैसे देऊन टाकतो
आरोप करणारा तरुण, विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरंच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषीकेश खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो.
आरोप करणारा तरुण, विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी.
ऋषीकेश खैरे: होय
आरोप करणारा तरुण, विजय: बरं ठीक आहे चालेल.

(हेही वाचा – शिंदे गटाकडून आव्हाडांना जशास तसे उत्तर; ‘लबाड बोका ढोंग करतोय’ म्हणतं जोरदार पोस्टरबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.