तालिबानी आणि Pakistan मध्ये कधीही सुरू होणार युद्ध; शस्त्रास्त्रे, रॉकेट लाँचर आणली सीमेवर

161

काही दिवसापासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने त्यात आणखी भर पडली आहे. आता १५ हजार तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य तैनात केले. पाकिस्तानी लष्कराच्या काही तुकड्या अफगाण सीमेवर पोहोचल्या आहेत. मीर अली सीमेजवळ अफगाण तालिबान पोहोचले आहेत.

(हेही वाचा मुंबई हल्ल्याचा आरोपी Abdul Rehman Makki याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रभारींना समन्स बजावले आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज झिया अहमद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (Pakistan) नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात ३० पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. अफगाण तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे AK-47, मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. शेहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकट, CPEC प्रकल्पाला होणारा विलंब आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावाद यासारख्या समस्यांशी झुंजत आहे. या मुद्द्यांमुळे सरकार आणि लष्कर दोघेही कमजोर झाले आहेत. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढले आहे.  स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या परिस्थितीमुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. (Pakistan)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.