अखेर तालिबानने पंजशीरवर मिळवला ताबा! ‘असा’ झाला संघर्ष!

पंजशीरच्या खोऱ्यात तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात संघर्ष सुरु असतो. सोमवार हा तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा शेवट दिवस होता.

76

अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानी पंजशीर खोरे मात्र ताब्यात घेणे शक्य होत नव्हते,  पंजशीरचा ताबा मिळवण्यासाठी तालिबान्यांचे १५ दिवसांपासून प्रयत्न सुरु होते, परंतु तालिबान्यांना नॉर्दन अलायन्सकडून प्रत्युत्तर मिळत होते. त्यामुळे तालिबान्यांचे प्रयत्न फोल ठरत होते. अखेर सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी तालिबान्यांनी पंजशीर खोरे ताब्यात घेतले.

१५ ऑगस्टपासून संघर्ष सुरु होता! 

पंजशीरच्या खोऱ्यात तालिबानी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात संघर्ष सुरु असतो. सोमवार हा तालिबान आणि नॉर्दन आघाडीतील युद्धाचा शेवट दिवस होता. तालिबानने आता पंजशीर खोरेही आपल्या ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिकृत माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. १५ ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर केवळ पंजशीर हेच तालिबानच्या नियंत्रणात नव्हते.

(हेही वाचा : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक! राजू शेट्टींच्या आंदोलनाची घेतली दखल)

अखेर तालिबान्यांनी फडकावला झेंडा!

पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधात लढा दिला जात होता. तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यातील नागरिकांची रसद बंद केली होती, वीज पुरवठा, पाणी पुरवठा बंद केला होता. त्याच बरोबर वैद्यकीय सेवाही बंद केली होती, असे ट्विट माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह केले होते. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पंजशीर तालिबान्यांनी ताब्यात घेतले. यानंतर तालिबानने पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.