पंजशीर आमचेच! तालिबानशी अजून लढत आहोत! अमरुल्ला सालेह यांचा दावा 

87

अफगाणिस्तानतात तालिबान अधिकृत सरकार स्थापन करण्यास काही अवधी बाकी असतानाच तालिबान्यांनी पंजशीर खोरे ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले. मात्र अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी हे वृत्त फेटाळून लावत पंजशीर आमचेच आहे, तालिबान्यांशी आम्ही लढत आहोत, असे म्हटले. तसेच नॉर्दन अलायन्सचा नेता अहमद मसूद यानेही हा दावा फेटाळून लावला आहे.

अहमद मसूद याने ट्विटरवरून पाकिस्तानवर टीका! 

नॉर्दन अलायन्सचा नेता अहमद मसूद याने यासंबंधी ट्विट करून पाकिस्तानवर टीका केली. ‘पंजशीरवर तालिबान्यांनी विजय मिळवल्याचे वृत्त देऊन पाकिस्तानी मीडिया दिशाभूल करत आहे. हे वृत्त खोटे आहे. पंजशीरवर तालिबान्यांचा विजय हा माझ्यासाठी शेवटचा दिवस असेल’, असे अहमद मसूद याने म्हटले आहे.

https://twitter.com/Mohsood123/status/1433830559336239107?s=20

आम्ही कुठेही पळालो नाही! – अमरुल्लाह सालेह

तर अफगाणिस्तानचे माजी उप राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट करत आम्ही कुठेही पळालो नाही. लढाई अजूनही सुरु आहे. तालिबान्यांनी आमची रसद बंद केली आहे. वैद्यकीय सेवा, वीज पुरवठा बंद केला आहे.

तालिबान्यांनी आनंदात केला गोळीबार! 

सुरुवातीच्या दिवसात तालिबान आणि अहमद मसूद यांच्यात चर्चा सुरु होती, मात्र तोडगा निघाला नाही. त्यानंतर तालिबान्यांनी पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी पंजशीरवर हल्ला केला. पंजशीरवर तालिबान्यांनी नियंत्रण मिळवले आहे, असे वृत्त रॉयटर्स यांनीही दिले. तालिबान्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून हे वृत्त प्रसारित झाले. पंजशीर ताब्यात घेतल्याच्या खुशीत तालिबान्यांनी काबूलमध्ये हवेत गोळीबार केला. त्यामध्ये लहान मुलांसह काही जण ठार झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.