अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तान येथून ३ हजार सैनिक मागे घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली आहे. जो बायडेन यांच्या या निर्णयाचे अमेरिकेत मात्र नकारात्मक पडसाद उमटू लागले आहेत. तालिबानचे वाढते प्रस्थ पश्चिमी देशांसाठी विशेषतः अमेरिकेसाठी धोक्याची घंटा आहे, असे सांगत सोशल मीडियातून अमेरिकन नागरिक आता ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’, असा नारा देऊ लागले आहेत.
जो बायडेन म्हणतायेत, अफगाण जनतेचे भविष्य तालिबानींच्या हाती!
अफगाणिस्तान येथून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना जो बायडेन म्हणाले कि, २० वर्षांपूर्वी तालिबानी दहशतवाद्यांनी अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला केला होता, त्याचा बदला घेणे इतकाच अमेरिकेचा उद्देश होता. त्याप्रमाणे अमेरिकेने अल कायदाचे समूळ उच्चाटन केले. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला आहे. आता अफगाणिस्तानातील नागरिकांचे भवितव्य अफगाण सरकार आणि तालिबानी यांच्या हाती आहे, असे जो बायडेन म्हणाले.
(हेही वाचा : दिल्लीत बस्तान बसवण्यासाठी ‘धनुष्या’ला हवाय ‘हात’!)
सोशल मीडियावर बायडेन यांच्यावर टीका!
जो बायडेन यांनी आता ताबडतोब देशाला संबोधित करावे, त्यांना जर देश सांभाळणे जमत नसेल तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. अमेरिकेला सांभाळण्यासाठी अनेक नेतृत्व तयार आहे, असे व्हाईट हाऊसमधील निवृत्त अधिकारी रॉनी जॅक्सन म्हणाले.
OUTRAGEOUS! Biden needs to address the nation TONIGHT. If he’s not mentally capable of handling this crisis, he needs to resign IMMEDIATELY. America deserves better than this – OUR VETERANS DESERVE BETTER THAN THIS! Come out of hiding at Camp David and do your damn job! https://t.co/I1zTcRLpgZ
— Ronny Jackson (@RonnyJacksonTX) August 16, 2021
डेमोक्रॅटिक पार्टीच्या सर्व सदस्यांनी पायउतार व्हावे. सध्याची परिस्थिती अमेरिकेसाठी चांगली नाही. अमेरिका केवळ जो बायडेन यांच्यामुळे अडचणीत आली आहे. रिपब्लिकनने सत्ता हाती घ्यावी, असेही अमेरिकेतील नागरीक म्हणू लागले आहेत.
I’m calling on all Republicans to step and say it is time to impeach Joe Biden and Kamala Harris.
Articles of Impeachment must be filed!
Joe Biden is on Vacation while America is downhill and #Afghanistan is in chaos
We need President Donald J Trump back#IMPEACHBIDENNOW pic.twitter.com/i3rI6cD0R6
— Terrence K. Williams (@w_terrence) August 15, 2021
काबुल विमानतळावर अभूतपूर्व गर्दी!
तालिबान्यांनी राजधानी काबूलचा ताबा घेताच काबुलमधील नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली आहे. काबुल विमानतळावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. त्या ठिकाणी घरदार सोडून नागरिक परदेशात जाऊ लागले आहेत. भारतानेही एअर इंडियाचे विमान काबुल येथे पाठवले असून भारतीय नागरिकही तेथील सर्व संपत्ती सोडून परत येत आहेत. अमेरिकेनेही त्यांच्या नागरिकांना आणण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे.
Join Our WhatsApp Communityfor a minute thought this was WEH morning traffic near Goregaon in #mumbai pic.twitter.com/6G5oMAv3JS
— HIMANSHU PARMEKAR (@hparmekar) August 15, 2021