तालिबानी दहशत : ट्विटरवर सुरु झालेल्या ‘इस्लामोफोबिया’ ट्रेंडवर नेटकऱ्यांचा प्रतिहल्ला

कॅनडातील टोरँटो येथे पोलिसांनी तपासणीसाठी मशिदीची मोडतोड केल्याची घटना घडली, त्यावर अचानक  इस्लाम धर्माला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे सांगत ट्विटरवरून #Islamophobia हा ट्रेंड सुरु झाला आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर लागलीच दहशतवाद सुरु केला आहे, रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला आहे. नागरिकांना मारहाण सुरु केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात दहशतीचे वातावरण सुरु झाले आहे. त्यातच कॅनडातील टोरँटो येथे पोलिसांनी तपासणीसाठी मशिदीची मोडतोड केल्याची घटना घडली, त्यावर अचानक  इस्लाम धर्माला लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे सांगत ट्विटरवरून #Islamophobia हा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अक्षरशः हल्ला चढवला आहे.

चार्ली हेब्दो हल्ल्या, लंडन, जर्मनी, पॅरिस येथे हल्ले, २६-११, ९/११ च्या हल्ल्यानंतर नंतर इस्लामोफोबियाबद्दल चिंता वाढू लागली. त्यांना आता इस्लामोफोबियाबद्दल चिंता वाटू लागली आहे. ते इस्लामोफोबियासाठी भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’ ला कारणीभूत ठरवत आहेत. पण लक्षात घ्या, हा कोणताही ‘फोबिया’ नाही तर लोक खरोखरीच तालिबान्यांमुळे दहशतीखाली आले आहेत.

(हेही वाचा : आता तालिबान्यांचे ‘हे’ आहे पुढील लक्ष्य! पुन्हा सुरु झाली युद्धाची तयारी!)

डाव्या विचारांचे काही जण अचानक #HindutavaTerror या हॅशटॅगने विना आधारे ट्विट करत आहेत, लेख लिहीत आहेत. त्यामाध्यमातून हिंदूंचा अवमान करत आहेत. जेव्हा आता तालिबानी दहशतवाद म्हणून सोशल मीडियातून टीका होऊ लागली तेव्हा मात्र त्यांना दुःख होऊ लागले आहे आणि त्याला ते इस्लामोफोबिया म्हणून आरडाओरडा करू लागले आहेत.

आता आपण तालिबान्यांवर टीका करायला नको, त्यामुळे इस्लामोफोबिया वाढत आहे, असेही काही जण म्हणाले.

मुसलमानांनी स्वतःच्या कर्माने इस्लामोफोबिया निर्माण केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here