काबूल विमानतळावर तालिबानी करणार हल्ला! अजून ‘इतके’ नागरिक अडकले!

अफगाणिस्तानात १० लाख लहान मुले आता बेवारस बनली आहेत, त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत मिळणे गरजेचे आहे, असे युनिसेफचे म्हणणे आहे.

98

अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरु असताना आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण तालिबानी आता थेट काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे अजून १० हजार नागरिक सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती अमेरिकेचे सैन्य प्रमुख मेजर जनरल विल्यम टेलर म्हणाले.

आतापर्यंत ७० हजारांची सुटका

पँटागॉनने दिलेल्या माहितीवरून अमेरिकेने मागील २४ तासांत १९ हजार नागरिकांची सुटका केली आहे, आता तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अर्थात १४ ऑगस्टपासून ७० हजार नागरिकांची सुटका केली आहे. गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रीयमंत्री मॅरिस पायन यांनी माहिती देताना सांगितले कि, तालिबानी दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा व्हिसा असलेल्या नागरिकांनी ताबडतोब देश सोडून ऑस्ट्रेलियात यावे, असे आवाहन केले.

(हेही वाचा : १६ हजार वीरांगणींच्या बलिदानाला ७१८ वर्षे पूर्ण! राणी पद्मिनीच्या पराक्रमाचे व्हावे स्मरण!)

१० लाख मुले बेवारस

अफगाणिस्तानात १० लाख लहान मुले आता बेवारस बनली आहेत, त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत मिळणे गरजेचे आहे, असे युनिसेफचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानातील युनिसेफने संयुक्त राष्ट्र परिषदेला यासाठी अन्न पुरवठा करण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत २०० मिलियन डॉलर देण्याची मागणी केली आहे. वर्ल्ड फूड प्रोग्राम चे कार्यकारी संचालक डेविड बेसली यांनी अफगाणिस्तानात १ तृतीयांश अर्थात १४ लाख जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण मागील काही वर्षांपासून देशात आर्थिक अडचणी, कोरोनाचे संकट होते. आता जागतिक बँकेने अफगाणिस्तानला देणारी सर्व आर्थिक मदत गोठवली आहे. २००२ पासून ५.३ बिलियन डॉलर इतकी मदत घोषित करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय सर्व प्रकारची मदत थांबवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.