तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री Udayanidhi यांचा उर्मटपणा; म्हणाले, मोदीजी…

हिंदी स्वीकारणारे त्यांची मातृभाषा गमावतात - उदयनिधी 

193

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी (Tamil Nadu DCM Udayanidhi) यांनी मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी म्हटले की, हिंदी स्वीकारणारी राज्ये त्यांची मातृभाषा गमावतात. केंद्राने भाषायुद्ध (language war) सुरू करू नये. या विधानानंतर, केंद्राच्या त्रिभाषा धोरणाबाबत आणि हिंदी (Hindi) सक्तीबाबात राज्यातील सत्ताधारी द्रमुक (DMK) आणि भाजपामधील वाद अधिक तीव्र झाला आहे.  (Udayanidhi)

गेल्या आठवड्यात वाराणसी येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी तामिळनाडू राज्य सरकारवर राजकीय हितसंबंध जोपासण्याचा आरोप केला. त्रिभाषा धोरणाबाबत (Tamil Nadu Trilingual Policy) दक्षिणेकडील राज्ये आणि केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. २०१९ मध्ये नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policy), प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागतील, त्यापैकी एक हिंदी असेल. तामिळनाडूमध्ये नेहमीच द्विभाषिक धोरण राहिले आहे. येथील शाळामध्ये तमिळ आणि इंग्रजी शिकवले जाते. १९३०-६० दरम्यान येथे भाषेबाबत अनेक चळवळी झाल्या आहेत. 

“धर्मेंद्र प्रधान यांनी आम्हाला उघडपणे धमकी दिली आहे की, जर आम्ही त्रिभाषिक सूत्र स्वीकारले तरच निधी दिला जाईल. पण आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आहोत,” असे उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे द्रमुकच्या नेतृत्वाखालील रॅलीत सांगितले.

(हेही वाचा – Cashew Benefits : जर तुम्ही दररोज काजू खाल्ले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ?)

उदयनिधी जनतेशी संवाद साधतांना म्हणाले की, “ही द्रविड आणि पेरियारांची भूमी आहे. मागच्या वेळी जेव्हा तुम्ही तमिळ लोकांचे हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा आम्ही ‘गो बॅक मोदी’ सुरू केले होते. जर तुम्ही पुन्हा प्रयत्न केला तर यावेळी आवाज ‘गेट आउट मोदी’ असा असेल. अशी उर्मटपणाची भाषण त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री त्रिभाषिक सूत्रावर म्हणाले, धर्मेंद्र प्रधान विचारतात की फक्त तामिळनाडूच याला विरोध का करत आहे. इतर सर्व राज्यांनी ते स्वीकारले आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.