माजी मंत्री Tanaji Sawant यांची शिवसेनेवरील नाराजी उघड

176
माजी मंत्री Tanaji Sawant यांची शिवसेनेवरील नाराजी उघड
  • प्रतिनिधी

धाराशिव परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) सध्या शिवसेनेविरोधात नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रीपद न मिळाल्याने सावंत यांची नाराजी वाढल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींमध्ये धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे त्यांच्या नाराजीने अधिकच जोर धरला आहे. सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेनेच्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी पासूनच शिवसेनेपासून अंतर ठेवले आहे.

(हेही वाचा – Donald Trump यांच्या नागरिकत्वाच्या आदेशाला भारतीय-अमेरिकन सिनेटर्सचा विरोध)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंत (Tanaji Sawant) सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, सावंत यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल ?

तानाजी सावंत हे परांडा तालुक्यात लोकप्रिय नेते असून शिवसेनेतही त्यांचा महत्त्वाचा विचार होतो. मात्र, मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुढील पावलांवर सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांचा शिवसेनेसोबतचा संबंध कायम राहील की त्यात बदल होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास अखेर बीसीसीआयची परवानगी)

या घडामोडींमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुढील भूमिकेवर राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.