टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी नेल्लोर जिल्ह्यातील कंचुकुर येथे अशीच घटना घडली होती. चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो ला तुफान गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरी सात जणांचा मृत्यू झाला होता.
आठवड्याभरात चेंगराचेंगरीची दुसरी घटना
रविवारी गुंटूर जिल्ह्यातील विकास नगरमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेलादेखील मोठा गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीमुळे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे घडलेल्या घटनेनंतर चंद्राबाबू यांनी एनटीआर ट्रस्टच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते.
( हेही वाचा: मुंबई -नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, दोघांचा मृत्यू )