मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा – राज ठाकरे

134

17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्व धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनेतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा असे राज ठाकरे म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसे का बोलले जात नसेल? अर्थात रझाकारांचे लांगुलचालन करण्यात धन्यता मानणा-यांचे सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं. त्यामुळे हे होणे स्वाभाविक होते. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असे की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

मनसेचा इशारा 

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक ‘सजा’ कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगरच्या महापालिकेत खुर्चित बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे सजा कार. अर्थात लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा: ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक; ACB ची मोठी कारवाई )

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. मला नेहमी वाटते की इतक्या मोठ्या लढ्याबाबत काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरही काही व्याख्याने युट्यूबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असे वाटते की या इतक्या गौरवशाली लढ्याबाबत फारसे कोणाला माहिती नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

माझे म्हणणे आहे की आता नवे शिक्षण धोरण येत आहे. त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला गेला पाहिजे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.