विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धडा शिकवा; J. P. Nadda यांचे आवाहन

53
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धडा शिकवा; J. P. Nadda यांचे आवाहन
  • प्रतिनिधी

राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. तर बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे अशा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी बुधवारी (१३ नोव्हेंबर) केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेल्या नड्डा यांनी बुधवारी वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लब हाऊस येथे शहरातील अभियंते, सनदी लेखापाल, डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मलबार हिल मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीमच्या जाहीर सभेत सदा सरवणकरांना का झाले अश्रू अनावर ?)

कर्नाटकातील काँग्रेसचा खासदार, दक्षिणेकडून केंद्राला अधिक कर जातो मात्र त्याचा विनियोग उत्तर भारतासाठी होत असल्याने, दक्षिण भारतासाठी स्वतंत्र देश हवा अशी भाषा करतो तेव्हा त्याचा निषेध ही होत नाही. जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्याला काँग्रेसची उमेदवारी मिळते. यावरून काँग्रेसचा देशविरोधी शक्तींना असलेला पाठिंबा दिसून येतो, अशी टीका नड्डा (J. P. Nadda) यांनी केली. महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची भूमी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे. मराठी सारख्या वैभवशाली परंपरा असलेल्या भाषेतील संतांनी, साहित्यिकांनी भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेची सामान्य माणसाला ओळख करून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे नड्डा म्हणाले.

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्या बॅग तपासणीला BJP चं प्रत्त्युत्तर; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती पूर्णपणे बदलून टाकल्याचे सांगत, गेल्या १० वर्षांत देशाच्या राजकारणाची परिभाषा कशी बदलली याचा विस्ताराने नड्डा यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, १० वर्षांपूर्वी देशात घराणेशाही, भ्रष्टाचार याला प्रतिष्ठा मिळाली होती. राजकीय स्वार्थासाठी धर्म, राज्य, भाषा यांच्या आधारे जनतेला एकमेकांविरुद्ध झुंजवत ठेवले जात असे. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर राजकारणाला विकासाची, उत्तरदायित्वाची, गरिबांच्या सेवेची भाषा केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आपल्या कामगिरीचे प्रगती पुस्तक वारंवार जनतेपुढे ठेवलेच पाहिजे, हे मोदी यांनी गेल्या १० वर्षांत आपल्या कृतीने दाखवून दिले. आपल्या प्रगती पुस्तकाबरोबरच पंतप्रधानांनी भविष्यकाळात देशाची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट करणारी धोरणेही जनतेपुढे नियमित रूपाने मांडली आहेत. यामुळे देशाची राजकीय संस्कृती आमूलाग्र बदलली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ नावाची नवी राजकीय संस्कृती जन्माला आली आहे, असे नड्डा (J. P. Nadda) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.