एका गैरसरकारी संस्थेच्या संबंधित असणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांना शनिवारी, २५ जून रोजी गुजरात एटीएसकडून मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसचे पथक मुंबईतील सांताक्रूझ येथे दाखल झाले होते, स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिस्ता सेटलवाड हिला अटक करून गुजरात एटीएस अहमदाबाद येथे रवाना झाले.
मोदी यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील अपील
२००२ मध्ये गुजरात येथे झालेल्या दंगलीप्रकरणी तिने पोलिसांना खोटी माहिती दिली होती, या प्रकरणात तिला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. २००२ च्या दंगली प्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी, २४ जून रोजी फेटाळून लावले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘मी न्यायालयाचा निकाल अतिशय काळजीपूर्वक वाचला आहे. निकालात तिस्ता सेटलवाडच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. तिस्ता सेटलवाड हिने पोलिसांना दंगलीबाबत निराधार आणि खोटी माहिती दिली होती, असे शहा यांनी या वृत्तसंस्थेला सांगितले. याप्रकरणात गुजरात एटीएस तिस्ता सेटलवाड हिला अटक करण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सेटलवाड राहत असलेल्या सांताक्रूझ पश्चिम येथे सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने सेटलवाड हिच्या घरी दाखल झाले व तिला ताब्यात घेऊन सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तिला गुजरात येथे नेले.
Join Our WhatsApp Community