काँग्रेस (Congress) नेते तहसीन पूनावाला (Tehseen Poonawalla) यांनी उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, उबाठा गटाने काँग्रेस पक्षाबाबत केलेले विधान हास्यास्पद आहे. आजही महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress)हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. हा सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. उबाठा गटाने आपले पक्षचिन्ह, नाव, आमदार, मते सगळे काही गमावलेले आहे. त्यात हाच उबाठा गट काँग्रेसला (Congress)कमकुवत पक्ष असल्याचे बोलत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जी काही मते मिळाली ती काँग्रेसची आणि मुस्लिम नागरिकांची मते आहेत.
उबाठाला काँग्रेसची मते मिळाली
पूनावाला म्हणाले की, उबाठा गटाला काँग्रेसची (Congress)आणि मुस्लिम मते वगळता इतर कुणाचीही मते मिळालेली नाहीत. उलट मराठी माणसांची मते एकनाथ शिंदेंना मिळालेली आहेत. हिंदूंची मते भाजपकडे गेली आहेत. त्यामुळे उबाठा गटाला कोणती मते मिळाली? असा सवाल करत उबाठा गटप्रमुख काँग्रेसवर टीका का करतात? असा प्रश्न पूनावाला (Tehseen Poonawalla) यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
संजय राऊत आणि उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे जितके काँग्रेसवर (Congress)हल्ला करतील, तितके जास्त नुकसान महाविकास आघाडीचे होणार आहे, असे ही काँग्रेस नेते पूनावाला (Tehseen Poonawalla) म्हणाले. तसेच काँग्रेस आज महाराष्ट्रातील सर्वात शक्तीशाली विरोधी पक्ष असल्याचे ही त्यांनी अधोरेखित केले.
Join Our WhatsApp Community