Tej Pratap Yadav : “राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले…” ; तेज प्रताप यादवचे अनोखे विधान

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राममंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्राणप्रतिष्ठेपूर्वीच संपूर्ण देशाचे वातावरण 'राममय' झाले आहे.

242
Tej Pratap Yadav : "राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले..." ; तेज प्रताप यादवचे अनोखे विधान

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र (Tej Pratap Yadav) तेज प्रताप यादव यांनी “रामजी २२ जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत”, असे म्हटले आहे. तेज प्रताप यादव यांनी दावा केला आहे की, भगवान राम यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितले होते की, ते २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य अभिषेक समारंभाला उपस्थित राहणार नाहीत.

(हेही वाचा – Sanjay Raut : Ram Mandir उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते; संजय राऊत यांचा आरोप)

काय म्हणाले तेज प्रताप यादव ?

निवडणूक संपताच राम विसरला जातो, असा आरोप तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी केला आहे. तो २२ जानेवारीला येणे अनिवार्य आहे का? चार शंकराचार्यांच्या स्वप्नामध्ये राम आले. रामजीही माझ्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले की ते येणार नाहीत, कारण हा ढोंगीपणा आहे. (Tej Pratap Yadav)

(हेही वाचा – Metrological Department : ‘एआय’मुळे कळणार अचूक हवामानाचा अंदाज ; शेतकऱ्यांना मिळणार फायदा)

तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचे भाऊ आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अद्याप या विषयावर भाष्य केलेले नाही. भाजपने देखील अद्याप यावर भाष्य केलेले नाही. मात्र, राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून देशभरात राजकारण तापले आहे. यासाठी भाजप आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. भाजपवर हल्ला करताना तेज प्रताप (Tej Pratap Yadav) म्हणाले की, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. एकदा निवडणुका संपल्या की मंदिराची चर्चा होत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.