२४ मे २०१७ पासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करमळी तेजस एक्सप्रेस मोठ्या दिमाखात सुरू केली. ही गाडी सुरू होवून आता किमान ६ वर्षे झाली असतील आता या गाडीचे तेज उतरले आहे, अशी अवस्था आहे.
४ वर्षात ‘तेजस’चा घसरला दर्जा
या गाडीत सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरे, सिट्सला हेडरेस्ट आणि फुटरेस्ट, प्रवाशांनाच्या मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रिन देण्यात आली होती. मात्र बऱ्याच प्रवाशांनी हे हेडफोन चोरून नेले त्यामुळे हे हेडफोन काढून टाकले. त्यामुळे प्रवाशांना स्वतःच्या हेडफोनवरून सिटीच्या मागे लावलेले टीव्ही पहावा लागत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या, तसे तेजसलाही बंद करण्यात आले. २०२० मध्ये तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाली, तेव्हा मात्र टीव्ही बंद पडले ते कायमचे बंदच राहिले. आता सध्या तेजसमध्ये नुसत्या स्क्रीन नावाला लावलेल्या आहेत. या गाडीत सर्वत्र वायफाय सुविधा मोफत देण्यात आली आहे, मात्र ही सुविधाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेने दिलेल्या सुविधा केवळ शोभेच्या आहेत का, असा प्रश्न पडतो. या गाडीत नुसती गाडी सुरू असते बाकी सर्व सुविधा बंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. त्यामुळे ‘तेजस’चे तेज केवळ नावापुरते राहिले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचा Union Budget : २०२३ च्या अर्थसंकल्पातील २३ महत्त्वाच्या घोषणा!)
Join Our WhatsApp Community