तेजसचे लाँचिंग लांबणार

155

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र तेजस यांचे राजकारणातील पदार्पण हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्याचा विचार पक्षाचा होता. पण प्रत्यक्षात पक्षावर आलेल्या मोठया संकटामुळे तेजसचे पदार्पण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पक्षाला पडलेल्या खिंडारानंतर पक्षाला सावरणाच्या परिस्थितीत तेजसचे राजकीय पदार्पण करून त्यांच्यावर नक्की जबाबदारी सोपवली जाईल,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर यांच्याकडे दिली जाणार मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी )

ठाकरे कुटुंबातून पहिले आमदार बनण्याचा मान मिळवला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना कार्याध्यक्ष .नवून राजकारणात त्यांचा प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची युवा सेनेच्या अध्यक्षपदी करून त्यांचाही राजकारणात प्रवेश केला. मात्र, युवा सेनेच्या अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळतानाच आदित्य ठाकरे यांनी सिनेटच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवत बाजी मारली. त्यानंतर वरळी विधानसभेतून निवडून येत ठाकरे कुटुंबातून पहिले आमदार बनण्याचा मान मिळवला आणि पर्यावरण व पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्रीपद भूषवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देतच त्यांचे राजकारणात पदार्पण करून देताना तेजसची आठवण शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. मी हा आदित्य तुमच्यावर लादलेला नाही, तर तुम्ही त्याला स्वीकारलेला आहे. परंत आदित्य पेक्षा उध्दव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आक्रमक आहे, माझ्या सारखा,असे ते म्हणाले होते. तेव्हापासून तेजसच्या राजकीय पदार्पणाची चर्चा शिवसेनेत रंगू लागली असून प्रत्येक शिवसैनिकांनाही तेजसबाबत उत्सुकता ताणली आहे.

तेजसची वर्णी लावून त्यांचे राजकीय पदार्पण करण्याचा निर्धार

मागील काही महिन्यांपासून तेजसच्या राजकीय पदार्पणाची चर्चा जोरात रंगू लागली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना तेजसचे राजकारणातील पदार्पण लवकरच होईल असे मागील वर्षी सांगितले. त्यानंतर तेजस सातत्याने रश्मी वहिनींसोबतच राजकीय सभांना हजेरी लावताना दिसत आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर दिलेल्या जागता पहाऱ्याच्यावेळी तेजसही तिथे हजेरी लावून गेला होता. त्यामुळे तेजसचे राजकीय पदार्पण लवकरच होईल असे बोलले जात असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३८ शिवसेनेचे आमदार फुटून गेल्याने पक्ष संकटात आला.

येत्या महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्धार केला असताना युवा सेनेच्या अध्यक्षपदी तेजसची वर्णी लावून त्यांचे राजकीय पदार्पण करण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याची माहिती मिळत आहे. परंतु आता पक्षच संकटात आल्याने तुर्तास तरी तेजसचे राजकारणातील लाँचिंग लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.