अमित शहांचा BRS सरकारवर हल्लाबोल; नोकरभरती, मोफत शिक्षणाची आश्वासने ठरली पोकळ

135
तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना BRS सरकारवर हल्लाबोल केला. तसेच भाजप यांना चांगला पर्याय ठरेल, असे शहा यांनी आश्वस्त केले. तसेच जनसंघापासून ते आतापर्यंत भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. जर तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते टीआरएस-बीआरएसकडे जातील. हे सर्व घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत, असेही अमित शहा म्हणाले.

काय म्हणाले अमित शहा? 

  • BRS सरकारमध्ये दारू घोटाळा झाला. २०२० च्या पूर मदतीतही घोटाळा झाला होता.
  • BRS सरकारमध्ये पेपरफुटीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही.
  • केसीआर हा 2 जी पक्ष आहे, ओवेसींचा पक्ष 3 जी पक्ष आहे, काँग्रेस 4 जी पक्ष आहे. येथे लोकशाही मूल्यांना स्थान नाही. निवडणुकीपूर्वी सगळे वेगळे होतात आणि निवडणुकीनंतर एकत्र येतात.
  • BRSने आपल्या जाहीरनाम्यात १ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, त्यांच्या सरकारमध्ये ८ पेक्षा जास्त पेपर लीक झाले, भरती होऊ शकली नाही.
  • ४० लाख मुलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणार होते, ते देऊ शकले नाहीत. ७ लाख गरीबांना घरे देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.
  • BRSचा गेल्या १० वर्षांतील एकमेव उपक्रम म्हणजे भ्रष्टाचार. या सरकारमध्ये पासपोर्ट घोटाळा, दारू घोटाळा, मियापूर जमीन घोटाळा, कलेश्वरम प्रकल्प घोटाळा झाला. बीआरएसने राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.

(हेही वाचा Tipu Sultan : टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना तुरुंगात टाका; मिलिंद एकबोटेंची पंतप्रधानांकडे मागणी)

धर्मावर आधारित आरक्षणाची व्यवस्था संपुष्टात आणू

तेलंगणातील जनतेला योग्य पर्यायाने जाण्याचे आवाहन करतो. मला खात्री आहे की तेलंगणातील जागरूक मतदार प्रत्येक गोष्टीचे अचूक विश्लेषण करतील आणि मतदान करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात ठेवतील. यानंतर त्यांची निवड निश्चितच ‘कमळ’ असेल, निश्चितच भाजप असेल. आम्ही सत्तेत आल्यास तेलंगणातील धर्मावर आधारित आरक्षणाची व्यवस्था संपुष्टात आणू. तसेच, आम्ही मुस्लिमांसाठी 4 टक्के आरक्षण काढून टाकू आणि त्याऐवजी मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ते सुनिश्चित करू, असेही अमित शाह यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.