चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता

140
चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता
चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता

तेलंगणाचे मुख्यमंत्री, बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड या दोनपैकी एका मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. याशिवाय तेलंगणातूनही ते लढतील, अशी खात्रीलायक माहिती आहे. थेट मुख्यमंत्रीच मैदानात उतरले तर महाराष्ट्रातील इतर मतदारसंघातील बीआरएसच्या उमेदवारांना फायदा होईल. आगामी विधानसभेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे आडाखे त्यांच्या उमेदवारीमागे बांधले जात आहेत.

(हेही वाचा – मार्सेलिस येथे उभारण्यात येणाऱ्या वीर सावरकर स्मारकासंदर्भात राहुल नार्वेकरांनी अमित शहांची घेतली भेट)

सहा महिन्यांत राव यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. नांदेडपासून ते चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत इतर पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांचे सातत्याने पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत. सभाही घेतल्या जात आहेत. लोकसभेत पक्षाचा विस्तार करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते स्वत:च मैदानात उतरणार असल्याचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी सांगितले. नांदेड, संभाजीनगर  या ठिकाणी पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न जोरात सुरु आहे. मात्र राजकीय जानकाराच्या मते याचा फायदा भाजपच्या मताची टक्केवारी वाढण्यात होईल असेही सांगितले जातेय.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.