बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- CM Eknath Shinde

134
बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’- CM Eknath Shinde
बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’- CM Eknath Shinde

“मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या शनिवारच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत आहे,” अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. परंडा (Paranda) येथे शनिवारी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. (CM Eknath Shinde)

लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेवून राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे. या योजनेसह शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरु राहतील. भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्या-टप्प्याने वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – वीज मंडळाच्या Retired कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा)

महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ, विठ्ठल मूर्ती, वीणा व घोंगडी देवून यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

(हेही वाचा – Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि बारामुल्लामध्ये चकमक, 2 जवान हुतात्मा; 2 जखमी)

परंडा (CM Eknath Shinde, Paranda) येथे शनिवारी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamnatri Ladki Bahin Yojna) वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Guardian Minister Dr. Tanaji Sawant), आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. (CM Eknath Shinde)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.