आधी पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट, आता संघाच्या मुख्यालयाची रेकी! यंत्रणा सतर्क

118

पंजाबच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचे कटकारस्थान उघडकीस आल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच नागपुरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी संघटना शहरात दहशतवादी कारवाया करण्याचा कट आखत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण संशयितांनी संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याचे समोर आले आहे. या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या जातीयवादी संघटना चवताळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नागपूर यंत्रणा सतर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी नागपुरातील अनेक प्रसिद्ध परिसरांचे फोटो आणि व्हिडिओ बनवले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. या माहितीनंतर सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सर्व प्रमुख ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

( हेही वाचा :इटलीहून आलेले आणखी एक विमान निघाले ‘कोरोना बॉम्ब’ )

याआधी करण्यात आला असा प्रयत्न

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आरएसएसच्या नेत्यांवर हल्ल्याचा कट रचल्याची चर्चा होती. हल्ल्यासाठी दहशतवादी आयईडी किंवा स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करू शकतात, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.