जम्मू आणि काश्मीरमधील (Kashmir) पूंछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले, तर तीन जण जखमी झाले. ज्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारतीय लष्कराच्या जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादाखल उत्तर देताना लष्कराच्या तीन जवानांना प्राण गमवावे लागले. मंगळवार, २० डिसेंबर रोजी संध्याकाळपासून या भागात असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराची लढाई सुरू आहे.
सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या परिसरात ही कारवाई सुरू आहे. अतिरिक्त फौजफाटा दाखल माहितीनुसार, घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असून वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री एक डीकेजी येथे संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रत्युत्तर देताना तीन जवानांना प्राण गमवावे लागले. एक जिप्सी आणि एक मिनी ट्रक अशी दोन लष्कराची वाहने सुरनकोट येथील बुफलियाज येथून राजौरीतील थानमंडीकडे जात होती. येथे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे मुख्यालय आहे. टोपा पीरच्या खाली वाहने येताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.
(हेही वाचा Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरातील अलंकार चोरीच्या घटना चालूच; चांदीचा मुकुटही गहाळ)
Join Our WhatsApp Community