दहशतवाद थोपविण्यासाठी वीर सावरकरांचे विचार अमलात आणण्याची गरज !

99

१३ डिसेंबर २००१ रोजी देशाचे मानबिंदू असलेल्या संसदेवर अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर २०१४ पर्यंत काँग्रेसच्या राजवटीत नागरी क्षेत्रात अनेक घातपाताच्या घटना घडल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याच वेळी सांगितले होते की, फाळणी करून काही फायदा होणार नाही, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुसलमान त्यांच्या देशात राहतील आणि आपले प्रश्न सुटतील अशी जी धारणा त्यावेळी करून घेण्यात आली होती, तसे न होता ती कायमची डोकेदुखी झाली आहे आणि ती कधीही न संपणारी आहे.

hemant tambat

या ना त्या निमित्ताने ते भारतात हल्ले करतच आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे मनसुबे आहेतच, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, मग ते लव्ह जिहाद असो किंवा लँड जिहाद असो. हे कुठेतरी थांबवण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. पण हे लष्कर उघड शत्रूंच्या विरोधात लढू शकतात पण देशात जे छुपे शत्रू आहेत. जे मुसलमानांच्या मतांच्या लालसेपोटी जे धर्मांध आणि अतिरेकी विचारांच्या मुसलमानांना पाठीशी घालत आहेत, त्याच्याशी ते लढू शकत नाही, पण मोदी सरकार आल्यापासून त्यांनी जे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या घटनांना आळा बसला आहे. देशात काश्मीरच नाही तर केरळ, बंगाल असो येथे जे घुसखोर आहेत, रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी हे देशाला पोखरणारी वाळवी आहे. त्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही तर देशासाठी त्रासदायक आहेत. त्यासाठी लोकही जागरूक झाले पाहिजेत. अफझल गुरु असो किंवा जेएनयूमधील तुकडे तुकडे गॅंग सारख्या देशविघातक प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे विचार सांगितले आहेत, त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. देश जर राहिला तर आपण राहू ही भावना असली पाहिजे. मुसलमान हे नेहमी एकत्र असतात, पण हिंदू

विभागलेले आहेत, काही हिंदू हे राजकारण करतात, खरेतर हिंदूंनी देशहिताचा विचार करून सक्षम राहिले पाहिजे तसेच समान नागरी संहिता लागू केली पाहिजे, आज ते २० कोटी आहेत म्हणून ते आताच डोईजड झाले आहेत, त्यांची लोकसंख्या आणखी वाढली तर देश असुरक्षित होईल, आफताब सारख्या धर्मांध विचाराच्या गुन्हेगारावर अजून कुणी मुस्लिम सेलिब्रेटी बोलला नाही, किंवा तथाकथित सेक्युलरवाले बोलले नाहीत, ही मानसिकता ओळखून लोकांनी धडा घेतला पाहिजे.

लेखक – हेमंत तांबट, विश्वस्त, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.