अफझल गुरूच्या मृत्यूचे उदात्तीकरण केले ही दुर्दैवी घटना

186

संसद देशातील सर्वोच्च मानबिंदू आहे, त्यावरच हल्ला हा राष्ट्राचा अपमान होता, तिथपर्यंत दहशतवादी पोहोचलेच कसे? हा खरे तर प्रश्न होता. दहशतवादी हातात शस्त्रे घेऊन संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचू शकतात त्यावरून सुरक्षेत ढिलाई होती, असा त्याचा अर्थ निघतो. २००८मध्येही दहशतवादी समुद्रीमार्गे मुंबईत येतात आणि आतपर्यंत पोहचतात, हे सरकार आणि सुरक्षा व्यवस्थेचे मोठे अपयश होते, आपल्याकडे गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्यांपेक्षा मोठी शिक्षा झाली पाहिजे असे झाले पाहिजे पण आपल्याकडे कायदे उलट गुन्हेगाराला फायदेशीर आहेत.

krantigeeta mahabal

शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकही निरपराध भरडला गेला नाही पाहिजे, पण निरपराध आधीच भरडला जात आहे. त्यामुळे कायद्याचा बडगा पुरेसा समर्थ नाही. कायद्याची भीती वाटत नाही. आपण पकडलो गेलो तरी भारतात आपल्याला सोडवणारे बरेच आहेत. अशी माणसे भारताच्या सरकारमध्ये आहेत, अशा प्रकारचा विश्वास त्यांना होता. त्यामुळे हे धाडस वाढले. गुन्हेगारांना भरपूर वकील मिळतात तसेच संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख गुन्हेगार अफझल गुरु सारख्या दहशतवाद्याच्या मृत्यूचेही उद्दात्तीकरण केले गेले, त्याला फाशी दिली, तरी त्याचे कौतुक केले गेले. मोठ मोठ्या यात्रा काढल्या गेल्या, हे कशाचे द्योतक आहे, कारण सुरक्षा व्यवस्था ढिली होती, कायद्याचे भय नव्हते. म्हणून दहशतवादी आतपर्यंत पोहचले. आजही परिस्थिती फारशी बदलली नाही नाहीतर आज एवढी लव्ह जिहादची प्रकरणे घडली नसती. आफताब सारखे धर्मांध मुसलमान पोसले गेले नसते.

लेखिका – क्रांतिगीता महाबळ, राष्ट्रीय कीर्तनकार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.