१३ डिसेंबर २००१ रोजी भारताचा मानबिंदू असलेल्या संसद भवनावर अतिरेकी हल्ला झाला. तेव्हापासून २०१४ पर्यंत देशात विविध नागरी क्षेत्रात अतिरेकी हल्ले झाले आहेत. या कालखंडात सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेवर होती. काँग्रेसच्या धोरणामुळेच दहशतवाद बळावला.
जेव्हा काँग्रेस आणि आघाडीचे सरकार आपल्या देशावर होते, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरिक सुरक्षा याविषयी खूप बोटचेपी धोरण सरकार अवलंबत होते, मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण अवलंबिले होते, त्यामुळे राष्ट्रविघातक प्रवृत्ती बळावल्या होत्या, त्यांना खुली सूट मिळाली, त्यामुळे पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला होता, काश्मीरसह भारतातील अन्य शहरांमध्ये दहशतवादी कारवाया आपण अनुभवल्या होत्या, त्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते, मोदी सरकार आल्यावर राष्ट्रीय सुरक्षा कणखर नेतृत्वाच्या हाती गेल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, त्यामुळे दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे. जे दहशतवादी हल्ले होत होते ते रोडावले आहेत, अशीच भूमिका घेतली तर निश्चितच परिस्थिती बदलणार आहे.
– मुकुंद गोडबोले, प्रसिद्ध वास्तूविशारद.
Join Our WhatsApp Community