राज्यातील हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत! नितेश राणेंचा आरोप

70

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मांध मुसलमानांनी मोर्चे, निदर्शने करताना हिंसाचार केला. तोडफोड, जाळपोळ केली. या हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला.

रझा अकादमीवर बंदी आणावी!

या हिंसाचाराला रझा अकादमी कारणीभूत आहे, असा आरोप ट्विटरद्वारे करताना नितेश राणे म्हणाले, राज्यातील विविध ठिकाणी जो हिंसाचार घडवून आणण्यात आला. त्यामागे दहशतवादी संघटना रझा अकादमीचा हात आहे. या संघटनेने राज्यातील विविध भागात हिंसाचार घडवून आणला. प्रत्येक वेळी ही संघटना कायदा मोडते आणि सरकार मात्र नुसते बघत बसते. त्यामुळे आता एकतर  सरकारने या संघटनेवर बंदी आणावी अथवा महराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला त्यांना संपवावे लागेल, असा इशारा राणे यांनी ट्विटर द्वारे दिला.

(हेही वाचा : न्यायालय म्हणाले, ‘मलिकांनी दाखवलेल्या वानखेडेंच्या कागदपत्रात खाडाखोड!’)

पोलिसांवर केलेली दगडफेक!

शुक्रवारी धर्मांध मुसलमानांनी मालेगाव, अमरावती या भागात खूप जाळपोळ, दगडफेक केली. त्यामध्ये मालेगावमध्ये १० पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. तर कोट्यवधी रुपयांचे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.