काश्मिरात बिगर कश्मिरी पोलिस कॅम्पमध्ये! ९०च्या दशकातील आठवणी…  

९०च्या दशकात जसे काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले होते, त्यांची पुनरावृत्ती होते का, अशी शक्यता निर्माण झाली आहे, मात्र मोदी सरकारनेही दहशतवाद्यांचा हा मनसुबा उधळवून लावण्याचा निर्णय घेतला आहे.

128

काश्मिरात मागील १५ दिवसांत ११ नागरिकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या आहेत. त्यात मागील दोन दिवसांतील रविवारी झालेला हल्ला हा तिसरा आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून परप्रांतीय कामगारांना लक्ष्य बनवले जात आहे. हे हत्यासत्र रोखण्यासाठी काश्मीर पोलिसांनी परप्रांतीय कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरात सुमारे ५० हजार परप्रांतीय वास्तव्यास आहेत. त्यांना तातडीने जवळच्या लष्करी छावणी वा पोलिसांच्या कॅम्पमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दहशतवाद्यांवर अंदाधुंद गोळीबार!

शनिवारी श्रीनगर आणि कुपवाडात झालेल्या बिहार व उत्तर प्रदेशातील कामगारावरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय कामगारांना लक्ष्य केले. अज्ञात दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली. कुलगाममधील कामगार राहत असलेल्या लारन गांगीपोरा वानपोह भागात दहशतावादी घुसले. भाड्याने रुम घेऊन राहत असलेल्या परप्रांतीयांवर दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. यात कामगार गोळ्या लागून जखमी झाले, तर दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. राजा रेशी देव आणि जोगींदर रेशी देव अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. दोघेही बिहारमधील आहेत.

(हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर विचित्र अपघात! ३ जण ठार!)

९०च्या दशकातील आठवणी! 

दरम्यान ३७० कलम हटवल्यावर काश्मीरमध्ये परराज्यातील नागरिकांचे वास्तव्य वाढू लागले आहे. या राज्याची स्वायत्तता संपल्याने दहशतवाद्यांचे प्रस्थ कमी होत होते. त्यामुळे काश्मिरात पुन्हा दहशतवाद्यांचे प्रस्थ निर्माण करण्यासाठी येथील काश्मिरी पंडितांसह पर राज्यातून आलेल्या कामगारांची हत्या करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे ९०च्या दशकात जसे काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले होते, त्यांची पुनरावृत्ती होते का, अशी शक्यता निर्माण झाली आहे, मात्र मोदी सरकारनेही दहशतवाद्यांचा हा मनसुबा उधळवून लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना ठार करण्याचे सत्र सुरु केले आहे. रविवारी एका इमारतीत लपून बसलेल्या २ दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सैन्याने ती इमारतच उडवली आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्याचा मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.