पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यालयातून गेल्या २४ तासात ५० लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी सध्या अधिक तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री २५ लाख रुपये पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी जप्त केले आहे. त्यानंतर त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना २४ तासात तुकाराम सुपेकडून ५८ लाख रुपये जप्त केले असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी १ कोटी ५८ लाख आणि ९० लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात
यापूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फुटल्यावर बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे. आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर कुठे प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(हेही वाचा – पेपर फुटी प्रकरणी १८ जण ताब्यात! तुकाराम सुपेच्या घरात सापडले घबाड)
1 कोटी 58 लाखांची रोकड हस्तगत
संजय सानप याचे मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याचेही बोलले जात आहे. म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. म्हाडा पेपरफुटीवरून हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते. दरम्यान, महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत ८८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सुपेच्या घरातून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती आहे. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी ९० लाखांचे घबाड हस्तगत केले होते. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीने सुपेच्या पत्नी आणि मेहुण्याने रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागला.
Join Our WhatsApp Community