शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. आता नाशिकमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे आणि शिंदे गटात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादादरम्यान एका अज्ञातानाचे हवेत गोळीबार केला. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भयावह वातावरण पसरले. या घटनेच्या वेळी तलावरी, कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन दोन्ही गटातील नेते एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नक्की काय घडले?
देवळाली येथील गणपती मंदिराजवळ शिवजयंतीच्या नियोजनकरीता सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती. यावेळी एका गटाला निमंत्रण न दिल्यामुळे वादाची ठिणगी पडली. माहितीनुसार या शिवजयंती उत्सव समितीवर शिंदे गटातील लवटे गटाचे वर्चस्व आहे. दरम्यान हा वाद जुन्या वादातून निर्माण झाला. त्यातच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हवेमध्ये गोळीबार केला आणि या ठिकाणी वातावरण अत्यंत चिंताजनक झाले. सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. या वादाच्या वेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे समर्थक तलवारी, कोयते आणि लाठ्याकाठ्या काढून एकमेकांच्या अंगावर धाऊन जात होते. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली आणि त्यामुळे परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. आता या भागात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
या घटनास्थळी उपनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरीपासून पोलीस आयुक्त अनिल शिंदेही दाखल झाले होते. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेतील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांची धरपकड सुरू आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे देखील काम सुरू आहे.
(हेही वाचा – विकासकामांमुळे अनेकांना पोटदुखी, मळमळ अन् धडकी भरली; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा)
Join Our WhatsApp Community