सत्ताधाऱ्यांना खुर्ची बोचायला लागली! फडणवीसांनी सांगितले सरकारचे भवितव्य 

140

महाविकास आघाडी सरकारमधील आंतरविरोध हळूहळू उघड होऊ लागला आहे. या सरकारमध्ये सहभागी प्रत्येकाचे काही ना काही स्वार्थ आहेत, जे आता मारले जाऊ लागल्याने त्यांना सत्तेची खुर्ची बोचायला लागली आहे. त्यामुळे आंतरविरोधानेच हे सरकार पडणार आहे. त्यानंतर मात्र भाजपकडे सरकार स्थापण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला.

सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद वाढत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने शिवसेनेवर आगपाखड सुरु केली असताना ‘सामाना’तून काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले जात असते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे महत्व कमी होत असल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये राष्ट्रवादीप्रती नाराजी आहे. अशा सर्व परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले.

आंतरविरोधाने भरलेले सरकार ५ वर्षे टिकणार नाही! 

इतिहासात आंतरविरोधाने भरलेले सरकार कधीही ५ वर्षे पूर्ण करू शकलेले नाही. हे सरकारही आंतरविरोधाने भरलेले आहे. आता  या सरकारमधील आंतरविरोध हळूहळू मोकळा होऊ लागला आहे. सत्तेमुळे ते एकमेकांना चिकटलेले आहेत. असे असेल तरी अशी सत्ता फार काळ टिकणार नाही. प्रत्येकाचे काही ना काही स्वार्थ आहेत, ते मारले जाऊ लागल्याने त्यांना आता सत्तेची खुर्ची बोचायला लागली आहे. ही परिस्थिती या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. पण म्हणून आम्ही सत्तेकडे नजर ठेवून बसलेलो नाही.

…तर मनसेलाही सोबत घेऊ! 

ज्या दिवशी हे सरकार आंतरविरोधाने पडेल, तेव्हा पर्यायी सरकार आम्ही नक्की देऊ, त्यासाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहे, त्यात मनसेलाही सोबत घ्यायला आम्हाला काहीही अडचण नाही. पण आजची तशी परिस्थिती नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली, तर आम्ही निश्चित याचा विचार करू, आज मात्र तशी काही चर्चा नाही. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत माझ्या भेटीगाठी आणि चर्चा सुरूच आहेत, असेही महत्वाचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

(हेही वाचा : पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत वाटपाला सुरुवात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.