सर्वसामान्य लोकांचे झाले, आता लोकप्रतिनीधींचे काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरे देण्यात येतील. त्यानंतर आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईमध्ये अनेक जण येतात त्यांना अन्न आणि वस्त्र मिळते, पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकण्यासाठी स्वतःचे घर नसते. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली युतीची सत्ता आली होती, तेव्हा झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच पाहिजे, हा विचार मांडला आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु झाले. पण त्याची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद होती. अनेक वर्षे जे लोक ट्रान्झीस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत, त्यांना घरे मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणल्या आहेत, त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी शिवसेना समजत नाही
आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते. पण आता नातवंडांच्या पण पुढे दिवस जात आहेत. फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधाला. तसेच मुंबईचा एवढा गांभीर्याने विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभीर्याने विचार केला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community