सरकारमध्ये मंत्री कमी बोलके पोपट जास्त! देवेंद्र फडणवीस यांची टीका

ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले नाही. केवळ इम्पेरिकल डेटा सादर न केल्याने ओबीसींचे महाराष्ट्रातील आरक्षण स्थगित करण्यात आले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी देखील संसदेत हा मुद्दा उचलून धरायचा असे ठरवले आहे. मात्र त्याआधीच राज्यातील भाजपने आपला आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेत्यांची कार्यकारिणी बोलावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.

पुढची २५ वर्षे मला भारतीय जनता पक्षात काम करायचे आहे. तरी मी जबाबदारीने बोललो कारण मला माहिती आहे, हे आरक्षण दिले जाऊ शकते. ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले नाही. केवळ इम्पेरिकल डेटा सादर न केल्याने ओबीसींचे महाराष्ट्रातील आरक्षण स्थगित करण्यात आले आहे. देशातले आरक्षण रद्द झालेले नाही. केवळ महाराष्ट्राचे आरक्षण रद्द झालेले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण रद्द झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सरकारच्या वेळेकाढूपणामुळेच राजकीय आरक्षण गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच सरकारमधील मंत्री खोटे बोलत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. 

(हेही वाचा : दरड दुर्घटना: जिल्हाधिकारी, म्हाडा, पीडब्ल्यूडी अलिप्तच, महापालिकेवरच भार)

सरकार वेळ मारून नेते!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीत आहेत. मात्र सरकार फक्त वेळ मारून न्यायची आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले. विधानसभेत ठराव पास केला जातो, की केंद्र सरकारने आम्हाला सेन्सस डेटा उपलब्ध करून द्यावा. हे षडयंत्र आहे. ६० ते ७० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फेब्रुवारीत येणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचा. फेब्रुवारीला या निवडणुका संपल्या, की पुढची सात वर्षे ओबीसी आरक्षण देऊनही फायदा नाही. त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. म्हणून केंद्राने डेटा द्यावा, असे रोज त्या ठिकाणी बोलले जात असल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here