एसटीच्या संपावरून पडळकरांनी केला गंभीर आरोप, म्हणाले…

127
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप अजूनही सुरूच आहे. राज्य सरकार कामगारांना विश्वासात घेऊ शकले नाही. आता तर सरकारने संपकरी कामगारांवर मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा आक्रमक बनले आहेत, त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला.

एसटीच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा कट 

आमदार पडळकर म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परबांची आंदोलनकर्त्या एस.टी. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे ही मुघलशाही आहे. ज्या पद्धतीने मुंबई मिल कामगारांचा संप चिघळवला आणि नंतर मिल मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली. त्याच हेतूने एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील करोडोंच्या जमिनीचा विल्हेवाट लावण्याचा परबांचा डाव दिसतोय, असा आरोप पडळकर यांनी केला.

कामगारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश 

मंत्री परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ हे एस.टी. कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत. त्याचा आम्ही विरोध व निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.