ठाकरे सरकारच म्हणाले, ‘अनिल परबांचे रिसॉर्ट बेकायदेशीर!’ 

166

परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट बेकायदेशीर असून त्या रिसॉर्टच्या जमिनीचा बिनशेती परवानाही बेकायदेशीर आहे, असे स्पष्टीकरण खुद्द महाराष्ट्र सरकारने दिले आहे. यासंबंधी सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याविषयीची माहिती ट्विट करून दिली आहे.

रिसॉर्टच्या जमिनीचा परवानाही बेकायदेशीर 

ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे रिसॉर्ट बांधला होता, तो बेकायदेशीर आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, त्यामुळे हा वाद पेटला होता. याची दाखल ईडीनेही घेतली होती. तसेच सोमय्या यांनी या रिसॉर्टची तक्रार लोकायुक्तांकडेही केली आहे. लोकायुक्तांकडूनही या रिसॉर्टची चौकशीही सुरु आहे. या प्रकरणी आता ठाकरे सरकारने लोकायुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच हे रिसॉर्ट बांधण्यासाठी ज्या जागेचा वापर करताना बिनशेती परवाना बनवण्यात आला, तो देखील फसवणूक करून मिळवला आहे, त्यामुळे तोही बेकायदेशीर आहे, असेही सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अनिल परब यांचे नाव अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीच्या आरोपामध्येही आले आहे. त्यामुळेही परब अधिक अडचणीत आले आहेत.

(हेही वाचा जेएनयूत अवतरली ‘बाबर’ची औलाद! म्हणतेय…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.