महिला सुरक्षेवरून ठाकरे सरकार येणार अडचणीत?

120

राज्यात अपहरणाच्या घटना वाढतायत राज्यात 25 हजार महिला, मुली गायब आहेत महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? इतकेच नाही तर दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय? असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला विचारला होता. तर राज्यात एका महिन्यात तब्बल २ हजार विनयभंद ११ महिन्यात १८०० मुलींच्या अपहरणाच्या नोंदी तर ४ हजार गुन्ह्यांची उकल झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला घेरलं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेवरून ठाकरे सरकार अडचणीत येणार असा प्रश्न सध्या उपस्थितीत केला जात आहे.

महिलांची जबाबदारी कधी घेणार

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात महिलांसंबंधित ५ हजार ५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ३ हजार ९६८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये महिलांच्या विनयभंग प्रकरणी १ हजार ९२० गुन्हे नोंद झाले आहेत. तर ४८४ अल्पवयीन मुलींसह ८२८ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. राज्यात महिला अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना ठाकरे सरकार अद्याप गप्प का आहे. शिवाय माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी तरी कधी घेणार असा प्रश्न भाजपने ठाकरे सरकारला विचारत त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेत बीजेपी मुंबई या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जाब विचारणा देखील केली आहे.

(हेही वाचा -‘राज्यात नेमकं चाललंय काय? …आता मुख्यमंत्रीही गायब’, चित्रा वाघ भडकल्या)

तसेच, आर्थिक राजधानीतही अजूनही महिलांचा हुंड्यासाठी अत्याचार सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच मानसिक, शारीरिक छळात देखील दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या ११ महिन्यात ७०४ गुन्ह्यांची नोंद झाली असून अपहरण झालेल्या महिलांचा सध्या शोध सुरु असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. तपास जरी सुरू असला तरी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भाजपाने राज्य सरकारचे लक्ष या प्रश्नावर केंद्रीत केले आहे.

महिलांविषयक गुन्हे वाढू नये म्हणून निर्भयाची स्थापना

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी साकीनाका घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करणे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करत गुन्ह्यांचे मदतीस समूळ उच्चाटन होण्यास महिलांच्या सुरक्षेसाठी १४ सप्टेंबर रोजी या पथकाची स्थापना केली. या पथकाद्वारे सध्या कानाकोपऱ्यातील महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.