राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील पक्षात सातत्याने गळीत होताना दिसत आहे. कोणी बंडखोरी करतंय, तर कोणी पक्षांतर करतंय. आता शिवसेना ठाकरे गटाच्या वाघिण, फायरब्रँड नेत्या वर्षा भोयर नाराज असल्याचं समोर आलं आहे. लवकरच त्या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहे.
भाजप खासदार नवनीत राणा यांना भिडणाऱ्या अमरावतीमधील शिवसेनेच्या धडाधडीच्या नेत्या वर्षा भोयर यांनी गुरुवारी, १९ जानेवारीला फेसबुकवर एक व्हिडिओ जारी करून आपण नाराज असल्याचे सांगितले. त्या भावनिक होऊन म्हणाल्या की, ‘जय महाराष्ट्र, वर्षा भोयर बोलतेय. नाराज आहे, पण उद्धव साहेबांवर किंवा रश्मी वहिनींवर नाही. पक्षातील जी काही विचारवंत मंडळी आहेत, ज्यांना आमच्यासारख्या मंडळींची गरज नाहीये. नवनीत राणां विषयी बोलताना कधी विचार केला नाही की, ती माझी वैयक्तिक दुश्मन आहे की काय? ज्यांनी उद्धव साहेबांवर बोट दाखवलं, ते तिथेच थांबवण्याच काम मी केलं. गेल्या १७ ते १८ वर्षांपासून सेनेचं जे काही काम असेल तर करत आली आहे. रात्रभर तुरुंगातही राहिली आहे. किती केसेस अंगावर घेतल्या आहेत. प्रामाणिक काम करत आलीये. पण जेव्हा माझ्या कानावर पडतं की, मी काहीच कामाची नाही. तेव्हा वाईट वाटतं. जे मी आज आहे, ते फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळेच. पण आज खूप वाईट वाटतंय.’ हा व्हिडिओ शेअर करतं त्यांनी लिहिलं की, ‘नाही कळत आहे काय करू म्हणून फक्त जय महाराष्ट्र’
तसेच याआधीच्या केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘काही आपले आपल्याला इतके हतबल करून टाकतात की शेवटी पर्याय नसतो चुकीचा निर्णय घेतल्या शिवाय. जय महाराष्ट्र.’ पण आता या नाराजीनंतर वर्षा भोयर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण वर्षा भोयर यांनी इतर पक्षात प्रवेश केला तर शिवसेना ठाकरे गटाचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे आता स्वतः उद्धव ठाकरे वर्षा भोयर यांची मनधरणी करतात का? हे येत्या काळात कळेल.
(हेही वाचा – नाशकातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; पुन्हा हवेत झाला गोळीबार)
Join Our WhatsApp Community