Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

239
Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
Thackeray group Banner: काय आहे हिंदुत्व? ठाण्यात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

ठाण्यात ठआकरे गटाकडून बॅनरबाजी (Thackeray group Banner) करण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पक्ष कुणी चोरला, असे म्हणत शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

(हेही वाचा –Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात)

“पक्ष कोणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व?” अशा आशयाचा बॅनर सध्या ठाण्यात झळकत आहे. तसेच यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअॅपद्वारे कळवा असेही यात नमूद करण्यात आले आहे. या खाली एक व्हॉट्सअॅप नंबरही झळकत असून त्यावर स्कॅनर कोडही देण्यात आला आहे. (Thackeray group Banner)

(हेही वाचा –Assembly Seat Sharing : सेना-राष्ट्रवादीचा जागावाटपासाठी भाजपाकडे जोरदार पाठपुरावा)

हे बॅनर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्याकडून लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष चोरणे हे हिंदुत्व नाही अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा सुरु झाली आहे. (Thackeray group Banner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.